Homeराज्यपस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस झालेल्या रुग्णावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार- राष्ट्रवादी नेते आ.जयंत...

पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस झालेल्या रुग्णावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार- राष्ट्रवादी नेते आ.जयंत पाटील यांच्या पुढाकाराने गरजू कुटुंबाला न्याय…

Share

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब , राष्ट्रवादी सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व असीभाई बावा यांच्या सहकार्याने आणि समीर कुपवाडे यांच्या मदतीने राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वर्षभर अनेक गरजू व गरीब रुग्णांची विविध शस्त्रक्रिया मोफत करण्याचे काम सुरू असते , त्याच माध्यमातून आज सांगली मध्ये सिव्हिल रुगणालायत पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस हा रोग झालेल्या पेशंटचे यशस्वी उपचार राष्ट्रवादी च्या पुढाकाराने करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी चे आरोग्य विभागाचे काम पाहणारे उमर गवंडी म्हणाले की ” काही दिवसांपूर्वी सांगली मधील एका तरुणी ला तीव्र पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस या त्वचारोगाचे निदान झाले होते हा रोग २ करोड लोकांमध्ये १ का ला होत असतो , रुग्णांच्या कुटूंबियांना खासगी रुग्णालयात सदर रोगाच्या उपचारासाठी ५ ते ६ लाख इतका येणार असल्याचे सांगितले होते कुटूंबियाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने येणारा खर्च ५ ते ६ लाख हा खर्च करणे शक्य न्हवते सदर कुटूंबानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज यांची भेट घेऊन सगळी माहिती दिल्यानंतर ,

राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी व राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी मला सूचना दिल्या , व मी तात्काळ पेशंट ला सांगली सिव्हिल येथे दाखल केले व सांगली सिव्हिल चे डॉ डॉ संतोष माळी सर , डॉ शुभम पाटील , डॉ गणेश सावळगे , डॉक्टर शुभाशिष ,डॉ शुभम गुजराथी , डॉ मयुरेश दीक्षित यांनी यशस्वी उपचार केले असे ततसेच या रुग्णासाठी खास करून स्किनचे तज्ञ डॉक्टर ,मानसोपचार तज्ञ डॉक्टर,डोळ्यांचे तज्ञ डॉक्टरया सर्व डॉक्टरांची टीम या रुग्णासाठी प्रयत्न करत होती.तसेच आज त्या पेशंटला डिस्चार्ज दिला,

यावेळी रुग्णांचे नातेवाईक यांनी राष्ट्रवादी चे व सांगली सिव्हिल चे आभार मानत सांगली सिव्हिल ला वाफे चे मशीन भेट म्हणून दिले आहे. यावेळी आरोग्यदूत , उमर गवंडी , प्रमुख सचिव शुभम जाधव , मुन्नाभाई शेख , शहानवाज फकीर , सलमान बाबा, शुभम ठोंबरे, नदीम मगदूम , रफिक बाबा, इम्तियाज शेख आदी पदाधिकारी व नातेवाईक उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: