Saturday, May 4, 2024
HomeBreaking Newsमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात…१० पेक्षा जास्त वाहने एकमेकांवर आदळली…पाहा व्हिडीओ…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात…१० पेक्षा जास्त वाहने एकमेकांवर आदळली…पाहा व्हिडीओ…

Share

किरण बाथम /रायगड
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी (दि.27) सकाळी खोपोली एक्झिट जवळ 13 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असून, यामधील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात का झाला याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मुंबईकडे येणार्‍या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी तातडीने दाखल होत मदतकार्य सुरु केलेले आहे. अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि 11 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता गाड्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: