Saturday, May 4, 2024
Homeगुन्हेगारीफ्लिपकार्ट वरून मोबाईल खरेदीत हातचालकी करून मोबाईल पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण...

फ्लिपकार्ट वरून मोबाईल खरेदीत हातचालकी करून मोबाईल पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक…

Share

८ लाख २ हजार २९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगली – ज्योती मोरे

फ्लिपकार्ट वरून मोबाईल खरेदी करून हातचलाकी करत महागडे मोबाईल पळवणाऱ्या दोघा इराणी युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खास बातमीदाराच्या माहितीनुसार सांगलीतील भारत सूतगिरणीच्या टेकावरून ताब्यात घेतले.

फ्लिपकार्ट वरून मोबाईल खरेदी करताना हातचलाकी करून महागडे मोबाईल पळवण्याचा अनेक घटना सध्या घडत होत्या,याबाबत तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार तपास करत असताना खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरचे मोबाईल इराणी समाजातील महंमद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी.वय वर्षे 29 आणि उम्मत युसुफ इराणी.वय वर्ष 29 दोघेही राहणार- सह्याद्री नगर, ख्वॉजा कॉलनी,सांगली.या दोघा युवकांना सांगलीतील भारत सूतगिरणीच्या टेकावरून ताब्यात घेतले.

दरम्यान,फ्लिपकार्ट वरून मोबाईल मागवुन नंतर त्या बॉक्समधील मोबाईल काढून घेऊन त्या ठिकाणी साबणाची वडी घालून तो बॉक्स आहे,तसा पॅक करून नंतर पैशाची अथवा इतर सबब सांगून ऑर्डर कॅन्सल करून तो बॉक्स डिलिव्हरी बॉय कडून परत दिला जात असल्याचे आरोपींनी कबूल केले.

अशा तऱ्हेने या दोघांनी एकूण 14 महागडे मोबाईल लाम्पास केले होते. त्यांच्याकडून सॅमसंग तसेच आयफोन कंपनीचे 14 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा कंपनीची डीओ गाडी, 2 साबणाच्या वड्या असा एकूण 8 लाख 2 हजार 297 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक, परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात, दीपक गायकवाड, हेमंत कुमार उमासे, सचिन धोत्रे, सुनील लोखंडे,राजू मुळे, कुबेर खोत, चेतन महाजन,संदीप नलवडे ,सागर लवटे, ऋतुराज होळकर,विनायक सुतार, सुनील जाधव, प्रशांत माळी, स्नेहल शिंदे,कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: