Monday, May 6, 2024
Homeराज्यमूर्तीजापूर तालुक्यातील बंद असलेले रोहित्र तातडीने सुरू करा - ग्रामीण पत्रकार संघाची...

मूर्तीजापूर तालुक्यातील बंद असलेले रोहित्र तातडीने सुरू करा – ग्रामीण पत्रकार संघाची मागणी…

Share

मुर्तिजापुर तालुक्यातील अनेक गावात रोहित्र नादुरुस्त किंवा जळाल्याने बंद स्थितीत असल्यामुळे याचा शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रब्बी पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे एकरी नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी मा.पी.एल.सिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुर्तीजापुर यांना निवेदन देण्यात आले. तर या निवेदनाच्या प्रती वरिष्ठांकडे देखील पाठविण्यात आल्या आहेत. तालुक्यातील बंद असलेल्या विद्युत रोहित्र (डि.पी.) त्वरित बदलून देण्यात यावे. सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू असून पिकांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.

पाण्याअभावी पिके जळण्याच्या तसेच उत्पन्नात घट येण्याचा धोका आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी नंतर पाणी नसल्यामुळे पिक निघालेच नाही . असेही प्रकार तालुक्यात घडल्याने शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाले आहे. त्याला जबाबदार कोण ? तालुक्यातील शेतकऱ्यांना रीडिंग नुसार विद्युत देयके (बिल) न देता अव्हरेज बिल देण्यात येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात मीटर बसवले असून त्या शेतकऱ्यांना रीडिंग नुसार बिल देण्यात यावे.

तसेच रात्री ऐवजी दिवसा विज पुरवठा शेती करिता देण्यात यावा.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आपणाकडे आलेल्या तक्रारी असल्यास त्या सोडवण्याचे काम आपल्या स्तरावरून लवकरात लवकर करावे व शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल याची गंभीर दखल घ्यावी. असे निवेदनात नमूद केले आहे.संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने शेतकऱ्याचे हिताकरिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनामध्ये दिला आहे‌.

निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष विलास नसले,सहसंघटक उध्दव कोकणे , उपाध्यक्ष अनिल भेंडकर,ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश रावत,तालुका अध्यक्ष अतुल नवघरे , प्रसिद्धी प्रमुख सुमित सोनोने , कायदेविषयक सल्लागार एडवोकेट निलेश सुखसोहळे,श्रीकांत डोईफोडे,कोषाध्यक्ष गौरव अग्रवाल,उपाध्यक्ष उबेद चाऊस,संतोष माने,उमेश साखरे,अंकूश अग्रवाल,विलास वानखडे, नितीन इंगळे , रवि शिंदे आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

मुर्तिजापुर तालुक्यातील शेतक-याच्या बंद विद्युत रोहित्र ( डि.पी ) बदलुन त्यानां (अँव्हेरेज) बिल न देता रिंडींग नुसार बिल द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने शेतकऱ्याचे हिताच्या विविध मागण्या करिता तीव्र आंदोलन करण्यात येईल.- विलास नसले (अकोला जिल्हा अध्यक्ष ग्रामिण पत्रकार संघ )


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: