Monday, May 13, 2024
Homeराज्यनरखेड कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ...

नरखेड कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ…

Share

नरखेड – अतुल दंढारे

शेतकऱ्यांच्या उत्पादित धान्याला योग्य भाव मिळावा या उद्देशाने आज सोमवारला कृषि उत्पन्न बाजार समिती नरखेड च्या आवारात धान्य बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या धान्य बाजारात धान्य विक्रीस आणणाऱ्या प्रथम शेतकरी सहजान शेख नरखेड यांचा बाजार समितीचे सभापती सुरेशराव आरघोडे यांनी दुपट्टा, टोपी, श्रीफळ हार व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.

सुमारे दोनशे क्विंटल तुर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या धान्य बाजारात विक्री करिता आणले. तुरीला सात हजार ते सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सोयाबीन चार हजार आठशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

धान्य बाजार शुभारंभ प्रसंगी समितीचे संचालक दिनेश्वर राऊत, रमेशपंत शेटे, रामलाल मरस्कोल्हे, अरुण वंजारी, बाजार समितीचे अधिकृत व्यापारी व अडते इरफान भाई खोजे, इद्रीस भाई पठाण शरद खुटाटे, सुनील खंडेलवाल, रमेश कांबळे, श्रावण सरोदे, फयजन भाई, माजी संचालक प्रशांतजी खुरसंगे उपस्तिथ होते . बाजार समितीचे सचिव सतीश येवले, कोषपाल, राधेशाम मोहरिया, सुनील कडू, पुरुषोत्तम दातीर, अमोल ठाकरे राहुल सोमकुवर व इतर कर्मचारी उपस्तिथ होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: