Thursday, May 9, 2024
Homeराज्यएस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन…

Share

मुंबई – गणेश तळेकर

दि. १५: देशातील पहिल्या एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस)  इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव वाकोडे, मे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आजम कुरेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी एलएनजी रूपांतरणमुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.

एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे.

महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. 

डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने महाराष्ट्रास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांचेबरोबर सामंजस्य करार (MOU)  केला असून त्यामध्ये परिवहनसाठी देखील एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. 

डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: