Homeराज्यस्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त...

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान…

Share

रामटेक – राजु कापसे

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे दि. १२ जानेवारी २०२४ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांचे हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमास विशेष व्याख्याता म्हणून भरत जोशी विदर्भ विभागप्रमुख, विवेकानंद केंद्र नागपूर, उपस्थित होते. यांनी स्वामी विवेकानंद यांचे युवकांना उद्बोधन याविषयी भाषण केले की, विवेकानंदांनी सन् १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले.

अध्यात्माने भरलेले भारताचे वेदांत तत्त्वज्ञान केवळ स्वामी विवेकानंदांच्या भाषणांमुळे अमेरिका आणि युरोपातील प्रत्येक देशात पोहोचले असे सांगितले, त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली जी आजही कार्यरत आहे. ते रामकृष्ण परमहंस यांचे योग्य शिष्य होते. त्यांच्या “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” या वाक्याने सर्वांचे मन जिंकले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांनी स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक शिक्षक होते. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असून विवेकानंदांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. सर्व संस्कृतजनांसाठी विवेकानंदांचे संस्कृत व सनातन प्रेम ही आदराची आणि सन्मानाची बाब असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉ. जयवन्त चौधरी, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून प्रो. हरेकृष्ण अगस्ती उपस्थित होते. तसेच प्रो. ललिता चंद्रात्रे, प्रो. कविता होले, प्रो. पराग जोशी, प्रो.प्रसाद गोखले, डॉ. राजश्री मेश्राम, तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन प्राक्शास्त्री द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. वैखरी काळे तसेच आभार प्रदर्शन प्रा. नितेश चकोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. मनाली पांडे, प्रा. सिमा गायकवाड, ऋतिक गायधने यांनी मोलाचे सहकार्य केले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: