Homeगुन्हेगारीयेचली रेती प्रकरणाची पोलिस विभागाकडून होणार चौकशी, सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांची उपविभागीय...

येचली रेती प्रकरणाची पोलिस विभागाकडून होणार चौकशी, सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार…

Share

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील बहूचर्चित येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकही रेतीची उचल न करता रेती वाहतूकीची टिपी येचली येथील दाखवून भामरागड, अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन बांधकामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर केला.

यात अवैध रेतीसाठा करुन तसेच बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत शासनाची दिशाभूल करीत कोट्यावधीच्या महसूलला चुना लावण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे केली आहे. यामुळे सदर प्रकरणाची आता पोलिस विभागाकडूनही सखोल चौकशी होणार असल्याने या प्रकरणात गुंतलेल्या संबंधिताचे धाबे दणाणले आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता भामरागड तालुक्यातील येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला होता. नियम व अटीनुसार 2120 ब्रास रेती उपसा करण्याचे आदेश महसूल विभागाच्या अधिका-यामार्फत मोजमाप करुन देण्यात आले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने येचली नदीपात्रातून रेतीचा उपसा न करताच भामरागड, अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन कामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर केला.

यामुळे जिल्हाधिका-यांच्या नियम, अटीला केराची टोपली दाखाविण्यात आली. यासंदर्भात तक्रार करताच यात 2115 रेतीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. तर ताडगाव येथे भामरागड तहसिलदारांनी 563 रेतीचा अवैध साठा ठेवल्याप्रकरणी 1 कोटीवर दंडात्मक कारवाई केली.

या प्रकरणातून नवनिर्माण बांधकामात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करुन त्याचा वापर झाल्याची शक्यता असल्याने विशेष चौकशी समितीद्वारे प्रत्येक रेतीसाठ्याची तपासणी करण्याची मागणी ताटीकोंडावार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. यातून कोटीच्या घरात प्रशासनाला महसूल प्राप्त होईल, असेही त्यांनी कळविले.

मात्र अद्यापपर्यंत संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी थेट भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर करीत अवैध रेतीसाठा व बनावट दस्ताऐवज बनवून शासनाची दिशाभूल करणा-या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: