Friday, May 17, 2024
Homeराज्यस्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ - माजी राजेंद्रजी जैन….

स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ – माजी राजेंद्रजी जैन….

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) हर मन के मित, शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेलजी यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजेत या उद्देशाने गोंदिया शिक्षण संस्था या नावाने शैक्षणिक रोपटे लावून गोंदिया व भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे काम केले. या शिक्षण संस्थेचे संगोपन करण्याचे काम खासदार प्रफुल पटेल व संस्थेच्या अध्यक्षा वर्षाबेन प्रफुलभाई पटेल यांनी समर्थपणे सांभाळले आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित जी.ई.एस हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय दासगाव येथे 27 ते 29 डिसेंबर असे तीन दिवसीय चाललेल्या शालेय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद तुरकर तर प्रमुख पाहुणे केतन तुरकर, राणू तुरकर, आनंदा वाढिवा, डोंगरे, हिरामण डहाट प्रामुख्याने उपस्थित होते.

राजेंद्रजी जैन पुढे म्हणाले की, स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. संधीचे सोने करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची आहे. यावेळी आयोजित विज्ञान प्रदर्शनीचे निरीक्षण जैन यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी दिनेश तुरकर, अंचल गिरी, तुलशि बोहने, छाया तुरकर, पुरुषोत्तम डोहरे, गीताताई उके, कादर शेख, भिवराव हरिणखेडे, झनकारसिह लील्हारे, परसराम पाचे, भीमप्रसाद कोहळे, सुरजलाल बरैया, राणू बरैया, रौनक ठाकूर, डी.एल.पारधी, बसेने सर, कोमल रहांगडले सहीत पालक वर्ग, नागरिक व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: