Friday, May 10, 2024
Homeराज्यदुर्गम भागातील आदिवासी जनतेच्या चेहऱ्यावर फुलले हसु...माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या एक दिवाळी...आपल्या...

दुर्गम भागातील आदिवासी जनतेच्या चेहऱ्यावर फुलले हसु…माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या एक दिवाळी…आपल्या लोकांसोबत राबविला उपक्रम…

Share


अहेरी – मिलिंद खोंड

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून वंचित आहेत.या ठिकाणी जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही त्यामुळे ईतर सोई सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या या भागात आल्लापल्ली येथील माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या कार्यकत्यांनी पोहोचून या भागातील आदिवासी जनतेसोबत एक दिवाळी आपल्या लोकांसोबत उपक्रम राबवून येथील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले.

अहेरी तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या कमलापूर पासून 30 किमी अंतरावर असलेल्या इंद्रावती नदीच्या मधोमध वसलेल्या कुर्ता या बेटावर माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या कार्यकत्यांनी पोहोचून दिवाळी फराळ, नवीन कपडे वाटप केले.त्यासोबतच नैनगुडम, रुमालकसा, आसा आदी.गावातील जनतेला ,शाळकरी मुलांना ,आबालवृद्ध लोकांना स्वयंसेवी संस्थे च्या वतीने दिवाळी फराळ व नवीन कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी माँ विश्वभारती सेवा संस्थे चे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार, अज्जू पठाण , अमोल कोलपाकवार, अहेरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद खोंड, गंगाधर रंगू, मिथुन चांद्रगडे ,प्रीतम तलांडे, सुरमवार आदीची उपस्थिती होती.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: