Monday, December 11, 2023
Homeराज्यसाधूंच्या सुरक्षितेसाठी कायदा व्हावा व शेअर मार्केट कंपन्या संदर्भात इडीकडे चौकशीची श्री...

साधूंच्या सुरक्षितेसाठी कायदा व्हावा व शेअर मार्केट कंपन्या संदर्भात इडीकडे चौकशीची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान ची मागणी…

Spread the love

सांगली – ज्योती मोरे

जत तालुक्यातील लवंगा या गावात दोन दिवसांपूर्वी तीर्थयात्रेसाठी चाललेल्या साधूवर मुले पळवणारी टोळी असल्याचे गैरसमजुतीतून जबरदस्त मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणांमध्ये उमदी पोलिसांनी तत्परता दाखवत वेळेवर हजर राहून साधूवर औषध उपचार करून संबंधितावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आल्याने, पोलिसांचे कौतुक केले आहे.

दरम्यान साधूंच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कायदा करावा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. तर सध्या पश्चिम महाराष्ट्रात शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक कंपन्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत असल्याने आणि अशा तऱ्हेने फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याने अशा कंपन्या विरोधात ईडी कडे चौकशीची मागणी करून, इन्कम टॅक्स अधीक्षकांकडेही सदर कंपन्यांचे व्यवहार तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे. आज ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: