Monday, May 6, 2024
HomeMarathi News TodayShraddha Murder | 'कसाई' आफताबची आणखीन धक्कादायक माहिती आली समोर...

Shraddha Murder | ‘कसाई’ आफताबची आणखीन धक्कादायक माहिती आली समोर…

Share

Shraddha Murder : वसईतील २७ वर्षीय श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या ‘कसाई’ आफताब अमीन पूनावालाचे वास्तव सातत्याने समोर येत आहे. यावेळी जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. मीडिया रिपोर्ट्स आहेत की जेव्हा आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि शरीराचे अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले, त्यावेळी तो दुसऱ्या मुलीलाही डेट करत होता आणि त्याच घरात तिच्यासोबत सेलिब्रेशन करत होता. स्वत:ला फूड ब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्ता असे सांगणाऱ्या आफताबबाबत दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याने ज्या पद्धतीने श्रद्धाची हत्या केली ती अत्यंत घृणास्पद आहे. आफताबने आधीच श्रद्धाला मारण्याचा कट रचला होता. यासाठी तो इंटरनेटवर लोकांना मारून पोलिसांपासून पळून जाण्याचे मार्ग शोधत असे.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वॉकरच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणात आफताबने सर्वप्रथम श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले. मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मृतदेहाचे दोन तुकडे घेऊन बाहेर पडून फेकून द्यायचा.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जेव्हा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यात आले तेव्हा आफताबने ते अवयव फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याचवेळी तो दुसऱ्या मुलीलाही डेट करत होता. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, त्याने कथितपणे दुसऱ्या मुलीला डेटवर दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत नेले होते.

बंबल एपच्या माध्यमातून आफताबने दुसऱ्या तरुणीशी जवळीक साधल्याचे दिल्ली पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरी मुलगी मानसशास्त्रज्ञ असल्याचे सांगण्यात येत आहे. ओळख उघड झाली नसली तरी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आफताबनेही या डेटिंग एपद्वारे श्रद्धाला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर श्रद्धा आणि आफताबचे प्रेम फुलले.

आफताब हा श्रद्धाला मारण्यासाठी खूप दिवसांपासून कट करत होता, असेही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी त्याने अनेक क्राईम शो आणि अनेक हॉलिवूड वेब सिरीजमधून खून करण्याचा प्लॅन जाणून घेतला. एवढेच नाही तर असे करून तो पोलिसांपासून पळून जाऊ शकतो हे शोधण्यासाठी तासनतास इंटरनेटवर घालवायचा. गुन्हेगाराने कितीही मोठी योजना आखली तरी तो नक्कीच पकडला जातो, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: