Saturday, May 4, 2024
Homeराज्यनांदेड मध्ये दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिमी संघटनेच्या चार सदस्यांना कारणे दाखवा...

नांदेड मध्ये दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिमी संघटनेच्या चार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

केंद्र शासनाने बंदी घातलेल्या सिमी संघटनेच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारे दोन व इतवारा हद्दीतील दोन सदस्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सपोनि सूभाष गोकूळ माने आणि इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.

राज्यासह जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. त्यामूळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अंतर्गत न्यायाधिकरणाच्या निर्देशानूसार व केंद्र शासनाच्या पत्रकाप्रमाणे बंदी’ घालण्यात आलेल्या सिमी संघटनेच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारे दोन सदस्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सपोनि माने यांनी नोटीस बजावले आहेत.त्याचबरोबर इतवारा हद्दीतीत राहणाऱ्या दोघांना पोलीस उप निरीक्षक रमेश गायकवाड यांनी नोटीस बजावलीआहे

बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम 1967 अन्वये सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आलेल्या दोन सदस्य यांना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कूमार, उपविभागीय पोलीस अधिकारी ईतवारा अति.का. नांदेड शहर सूशिलकुमार नायक,शिवाजीनगर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालींदर तांदळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सूभाष गोकूळ माने यांनी कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत.तर इतवारा हद्दीतील पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रमेश गायकवाड,पोलीस कर्मचारी शेख इम्रान,मेहकरकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: