Saturday, May 4, 2024
Homeराज्यमहापालिका आयुक्तांवर बूट फेकून मारला - लोकशाही दिनात प्रकार, कर्मचाऱ्यांचे आंदोलन...

महापालिका आयुक्तांवर बूट फेकून मारला – लोकशाही दिनात प्रकार, कर्मचाऱ्यांचे आंदोलन…

Share

सांगली – ज्योती मोरे

महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सुरू असताना कैलास काळे या इसमाने त्याचा गुंठेवारी प्रकरण 2012 साली महापालिकेत दाखल करून ही आजतागायत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आणि पूर्वी त्याची जी काही फी होती भरली असतानाही आता नवीन दरा प्रमाणे आकारणी महापालिका प्रशासनाकडून केली जात असल्याचा,राग मनात धरून सदर इसमाने आयुक्त सुनील पवार यांच्या दिशेने बूट फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

सदर घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी आवारात येऊन आंदोलन करत कैलास काळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला.दरम्यान आयुक्तांनी आपल्या कार्यालयातील दप्तर दीरंगाईवर लक्ष देऊन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांनी दिली. ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला,असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: