Monday, December 11, 2023
Homeराज्यशिवसेनेची रामटेक तालुका कार्यकारणी अखेर बरखास्त...

शिवसेनेची रामटेक तालुका कार्यकारणी अखेर बरखास्त…

Spread the love

  • येत्या पंधरवड्यात नवीन कार्यकारणी होणार गठीत
  • रामटेक तालुकाप्रमुख विवेक तुरक यांची माहिती

रामटेक – राजु कापसे

शिवसेनेची रामटेक तालुका कार्यकारणी अखेर बरखास्त करण्यात आलेली असून येत्या पंधरवड्यात नवीन कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख विवेक तुरक यांनी एका प्रेस नोट द्वारे दिलेली आहे.

पक्ष संघटनेत वाढ तथा पक्षाच्या बळकटीकरणाचे काम येत्या काही दिवसांत करण्याचे योजिले असल्याकारणाने तसेच नव्या चेहर्‍यांना या कार्यकारणीत संधी द्यायची असल्याकारणाने हे पाऊल उचलावे लागले असल्याचे मत शिवसेना तालुकाप्रमुख विवेक तुरक यांनी दिलेल्या प्रेस नोट द्वारे सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांनी सुद्धा या बरखास्त ठरावाला मंजुरी दिलेली आहे. रामटेक तालुक्यातील शिवसेनेमध्ये नवचैतन्य आणण्याचा उद्देश असल्याचेही म्हणाले.

पक्ष कार्यकारणी मध्ये काम करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेटिंग वर असलेल्या कार्यकारणीला मुहूर्त मिळाला असून येत्या पंधरवड्यातच नवीन कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख विवेक तुरक यांनी दिलेल्या प्रेसनोटद्वारे सांगितले आहे.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: