Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayशिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर उद्या शिंदे गटात सामील होणार…अब्दुल सत्तारांचा दावा…

शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर उद्या शिंदे गटात सामील होणार…अब्दुल सत्तारांचा दावा…

राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर हे ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराने शुक्रवारी केला. माजी मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

तर याधीच खोतकर शिंदे गटात गेले होते अशी चर्चा सुरु होती मात्र या चर्चेवर त्यांची विराम दिला होता.तेव्हा ते दिल्ली होते, त्यानंतर खोतकर यांची समजूत काढण्यासाठी अब्दुल सत्तारांना दिल्ली जावे लागले. मात्र यावर आज निर्णय घेणार असल्याचे खोतकर यांनी म्हटले होते. याआधी जीवनभर ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याची सांगितले होते.

खोतकर हे मूळचे जालना जिल्ह्यातील आहेत. 2014 ते 2019 या काळात ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांना नुकतीच पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदी बढती दिली.

सत्तार म्हणाले, “”खोतकर सुरुवातीला बंडखोर गटात सामील होण्याबाबत संभ्रमात होते, पण मी त्यांचा संभ्रम दूर केला. आता ते सिल्लोड येथे 31 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिबिरात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक बाजार समितीचे सदस्य, माजी नगरसेवकही असतील.

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खोतकर यांना रिंगणात उतरवण्याच्या यापूर्वीच्या विधानाबाबत विचारले असता सत्तार म्हणाले,

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खोतकर यांना रिंगणात उतरवण्याच्या यापूर्वीच्या विधानाबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, “जालना लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा अजूनही कायम आहे. मात्र दानवे आणि त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तो वगळला पाहिजे. राज्यातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: