Friday, May 10, 2024
Homeराज्यलाखपुरी नगरीत शिवजयंती साजरी...

लाखपुरी नगरीत शिवजयंती साजरी…

Share

लाखपुरी – मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लाखपुरी येथील धम्मशिवली चौकामधील बौध्द विहार मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अतुल नवघरे, पत्रकार आकाश जामनिक, गजानन गवई, रामेश्वर जामनिक प्रविण जामनिक आदित्य दहिहांडेकर सह इ. ची उपस्थिती होती.

ग्रामिण पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष अतुल नवघरे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मीतीच्या तसेच पराक्रमाच्या गाथा सांगण्याकरिता एक- दोन तासाचा वेळ पुरेसा नाही. तर शिवचरित्र समजुन घेण्यासाठी शिवभागवतांची गरज असल्याचे मत अतुल नवघरे यांनी सागितले यावेळ.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.शिवजयंती साजरी करण्याकरीता व यशस्वी करण्या करिता लाखपुरी येथील शिवभक्त ग्रामस्थ उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचालन आकाश जामनिक यांनी केले तर आभार गजानन गवई यांनी मानले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: