Thursday, November 30, 2023
Homeराज्यआरक्षणाची गळचेपी करणारे शरद पवारच आहेत असा जोरदार टोला सांगलीचे पालकमंत्री तथा...

आरक्षणाची गळचेपी करणारे शरद पवारच आहेत असा जोरदार टोला सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे…

Spread the love

सांगली – ज्योती मोरे.

कंत्राटी भरतीचे पिल्लू महाविकास आघाडीचंच असून सुशील कुमार शिंदे पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत ही प्रक्रिया चालत आली असून त्यांचाच निर्णय राबवण्याचं काम आम्ही केलं पण आजच आरक्षणाचा विषय कसा काय आला ? 2003 पासून ज्या भरत्या केल्या त्यात आरक्षणाचा विचार आला नाही का ?

आरक्षणाची गळचेपी करणारे शरद पवारच आहेत असा जोरदार टोला सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी लगावलाय. आज या कंत्राटी भरती विरोधात भाजपाच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दीपक बाबा शिंदे, मकरंद देशपांडे, मोहन व्हनखंडे,माजी नगरसेविका स्वाती शिंदे,सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, गीतांजली ढोपे पाटील, लक्ष्मण नवलाई आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: