Friday, February 23, 2024
Homeराज्यशाहिर भूषण पुरस्कार शाहिर प्रकाशदादा ढवळे यांना जाहिर...

शाहिर भूषण पुरस्कार शाहिर प्रकाशदादा ढवळे यांना जाहिर…

Share

सांगली – ज्योती मोरे.

शाहिर भुषण पुरस्कार शाहिर प्रकाशदादा ढवळे पुणे यांना जाहीर, चिंचणी ता.तासगांव येथिल शाहिर महर्षी र.द.दिक्षित प्रतिष्ठान व महाराष्ट्र शाहिर परिषद सांगली जिल्हा यांच्या सहकार्याने क्रांतीशाहिर र.द.दिक्षित यांच्या 17 व्या पुण्यतिथी निमित्त दि.16 जानेवारी 2024 रोजी दत्त मंदिर चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सायं 6 वाजता शाहिरी क्षेत्रातील कार्याबद्दल शाहिर प्रकाश दादा ढवळे पुणे यांना शाहिर भुषण पुरस्कार व हुशार व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पुरस्कार वितरण सोहळा साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सदाशिव भाऊ माळी लोकनियुक्त सरपंच चिंचणी व प्रमुख पाहुणे मा. डॉ.श्री.अच्युत जाधव चिंचणी व जनशाहिर दादा पासलकर पुणे, प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र शाहिर परिषद या मान्यवरांच्या हस्ते होणार असून रात्री 9 वाजता हि रात्र शाहिरांची हा मान्यवर शाहिराचा पोवाडा कार्यक्रम सादर केला जाणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठान प्रमुख श्री.काशिनाथ दिक्षित व जिल्हा अध्यक्ष शाहिर अनंतकुमार सांळुंखे यांनी केले आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: