Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayखोडगाव येथील शाहीर अतकरे यांचा भंडारा येथे सत्कार...

खोडगाव येथील शाहीर अतकरे यांचा भंडारा येथे सत्कार…

रामटेक – (तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खोडगाव येथील रहीवाशी तथा ग्रामपंचायत काचुरवाहीचे उपसरपंच व तसेच या भागातील प्रख्यात शाहीर श्री. शिशुपाल अतकरे यांचा दवडीपार भंडारा येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

दवडीपार भंडारा येथे भारतीय लोककला संघ आणी सर्व समावेशक लोककला संघ भंडारा द्वारे स्वातंत्र्य दिनाचा अमृत मोहोत्सव, साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त १४आगस्टला शाहीर सूबोधजी कान्हेकर संस्थापक अध्यक्ष यांचे हस्ते शाहीर शिशुपाल अतकरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद नागपूर, अरुणजी मेश्राम, भगवान लांजेवार, प्रदिप कळंबे , रवी मेश्राम, गजानन वडे, चिरकुट पुंडेकर. वासुदेव नेवारे, रमेश रामटेके, पालासर डडमल, रवि नानवटकर यांनी शाहीर शिशुपाल अतकरे यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: