Saturday, May 4, 2024
Homeराज्यसांगली | नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांची अॅक्रोबिटिक्स जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी...

सांगली | नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांची अॅक्रोबिटिक्स जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने दिनांक 9 ऑक्टोंबर 2023 रोजी सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय आक्रोबिटीक्स स्पर्धेचे आयोजन 19 मुला मुलींच्या स्पर्धेचे करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी 1) रुद्र प्रताप सिंग 2) सोहन घोष 3) सोहन अथनिमठ 4) मितेश शेटे यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संपादन केले व त्यांची विभागीय स्तरीय आक्रोबिटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली.

तसेच संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड व प्राचार्य संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण तसेच क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी व विनायक जोशी स्पोर्ट्स इनचार्ज प्रशिक्षक सुमित सावंत यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: