Friday, May 17, 2024
Homeराज्यशाळेनी काढली विद्यार्थी व पालकांची सहल - एस आर के इंडो किड्स...

शाळेनी काढली विद्यार्थी व पालकांची सहल – एस आर के इंडो किड्स चा अनोखा उपक्रम…

Share

  • विद्यार्थ्यानं सह पालकांची सहल.
  • शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारा शाळेचा उपक्रम.
  • पालकांचा सहलीला उत्स्पूर्त प्रतिसाद.
  • विद्यार्थी व पालक एकत्र सहलीला.

नरखेड – एस. आर. के इंडो किड्स जलालखेडा या शाळेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आले. नेहमी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येत असते. परंतु एस. आर. के. इंडो किड्स या शाळेच्या वतीने विद्यार्थी व पालक यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले.

रविवारला शिव तीर्थ या वॉटर पार्कला विद्यार्थी व पालक सहल नेण्यात आली. या उपक्रमाला पालकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणत पालकांनी सहलीत सहभाग घेतला. पालकांना शाळेच्या दिवसांची आठवण करून देण्यासाठी व त्यांनी त्यांच्या मुलांसोबत सहलीचा आनंद घ्यावा तसेच शिक्षक व पालक यांच्या मैत्रीचे नाते निर्माण व्हावे तसेच सर्व पालक एकत्रित यावे या उद्देशाने शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले.

तसेच शाळेच्या वतीने महिला पालकांसाठी मकर संक्रांती निमित्त सहलीच्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. या सहलीला नर्सरी ते के जी 2 चे विद्यार्थी व पालक असे एकूण 70 लोक सहभागी झाले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: