Saturday, May 4, 2024
Homeराज्यसराईत गुन्हेगार अबूच्या पायावर गोळीबार करून पोलिसांनी घेतले ताब्यात...

सराईत गुन्हेगार अबूच्या पायावर गोळीबार करून पोलिसांनी घेतले ताब्यात…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील देगलूर नाका परिसरातील खुदबेनगर येथील सराईत गुन्हेगार शेख आवेश उर्फ अबू शेख महेमूद यास डी मार्ट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल पाठलाग करत तो पळून जात असताना त्याच्या पायावर गोळीबार करून त्यास ताब्यात घेतले आहे.सदरील घटना आज दुपारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील सराईत गुन्हेगार शेख आवेस उर्फ अबू याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पोलिस अबूच्या शोधात होती. अबू हा डीमार्ट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी आपल्या पथकाद्वारे फिल्डिंग लावली होती.

परंतु अबूला पोलिसांचा सुगावा लागताच अबू पळून जाऊ लागला . पोलिसांनी त्यास थांबण्याकरिता सांगितले परंतु तो न थांबता पळू लागला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी स्वतः जवळची पिस्टलने त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली गोळी मारून जखमी केले आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: