Homeराज्यहंचिनाळचे संतोष संकपाळ समाज सेवा पुरस्काराने सन्मानित...

हंचिनाळचे संतोष संकपाळ समाज सेवा पुरस्काराने सन्मानित…

Share

गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले

दि ग्रेट सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन बेळगावी यांच्या वतीने सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सहकार उद्योजक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्माननीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिवर्षी राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते राष्ट्रीय पुरस्कार या वर्षीचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार दि.26 रोजी गोव्यातील गणपत पारसेकर काॅलेज ऑफ एज्युकेशन हलवन गोवा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

यामध्ये सामाजिक मानव हा श्रेष्ठ धर्म मानुण सेवा करणारे व आपल्या वृद्ध आईवडिल अंथरुणावर खिळून असताना अखंड अविरत 18 वर्षी सेवा करणारे हंचिनाळ ता.निपाणी जि.बेळगावी गावचे सुपुत्र संतोष गुंडोपंत संकपाळ राष्ट्रीय आर्दश समाजसेवा गौरव नॅशनल अवॉर्ड 2023 पुरस्कार गोवा येथे देशातील दिग्गज व नामांकित मान्यवरांच्या हस्ते हस्ते देण्यात आले.

सन्मानचिन्ह विषेश प्रमाणपत्र चदनाचा कायम स्वरुपी हार व केंद्रीय माजी मंत्री याचं आभिनदनाचे पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर मा.केद्रिय कायदे मंत्री वीरप्पा मोईली कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील होते तसेच खासदार अमरसिंह पाटील व जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघांनावर जिल्हा पोलिस प्रमुख अतिरिक्त बिदर कर्नाटक सरकार व हलमनचे सरपंच अमित सावंत हे होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छोट्या वटवृक्षाला पाणी घालून य कारेक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कारेक्रमाला दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक गुजरात गोवा या राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील व परिसरातील मान्यवर हितचिंतक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: