Homeराज्यसांगली | जत तालुक्यातील उमदीमधील समता आश्रम शाळेत सुमारे पावणे दोनशे मुलांना...

सांगली | जत तालुक्यातील उमदीमधील समता आश्रम शाळेत सुमारे पावणे दोनशे मुलांना अन्नातून विषबाधा…

Share

मिरज सिव्हीलसह माडग्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जत तालुक्यातील उमदी मधील समता आश्रम शाळेतील सुमारे पावणे दोनशे मुलांना रात्री जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.सर्व विद्यार्थ्यांना माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासह मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

जत तालुक्यातील उमदीमधील समता आश्रम शाळेत पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतची मुलं शिक्षण येतायत.काल सायंकाळी त्यांना शाळेच्या वतीनं उमदी मधील एका कार्यक्रमात शिल्लक राहिलेलं जेवण देण्यात आलं होतं.

सदर जेवण खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू होऊन अशक्तपणा येऊन तब्येत बिघडू लागल्यानं तालुक्यातील माडग्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं,मात्र काही विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच बिघडू लागल्यानं सव्वीस विद्यार्थ्यांना मिरज मधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.दरम्यान विद्यार्थ्यांची तब्येत उपचारानंतर स्थिर आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: