Monday, December 11, 2023
Homeराज्यरामटेक | बोरी जंगल शिवारात आढळले अनोळखी महिलेचे शव...

रामटेक | बोरी जंगल शिवारात आढळले अनोळखी महिलेचे शव…

Spread the love

संशय : घातपाताच्या दिशेने तपास सुरु

रामटेक – राजु कापसे

रामटेक तुमसर रोड वर बोरी गाव असुन रोड च्या बाजुला जंगल शिवारात अदाजे १०० मि. अंतरावर एक अनोळखी प्रेत असल्याची माहीती गावातील पोलीस पाटील राहुल कारामोरे यांना मिळताच माहीतीची शहानिशा करण्यासाठी ते घटनास्थळाकडे रवाना झाले.

सदर घटनास्थळी जाऊ पाहीले असता एक अनोळखी महीलेचा प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत आढळून आले .अंदाजे पाच फुट उंची असलेल्या कुजलेला महीलेच्या मृत्यदेह आढळला. लगेच पोलीस पाटील यांनी रामटेक पोलीस स्टेशन ला कळविले. पोलीस यांना घटनेची माहीती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचा घातपात तर झाला नाही. पोलीस पाटील च्या तोंडी रिपोर्ट वरुन महीलेचे प्रेत आपल्या ताब्यात घेऊन सदर पोलीस चौकशी करुन मरणारी अनोळखी महीलेचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असावे.

महिलेचे मृत्यदेह विच्छेदनासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक यादव साहेब यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे साहेब करत आहे


Spread the love
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: