Friday, May 24, 2024
Homeगुन्हेगारीरामटेक | एस.टी. च्या चाकाखाली येवुन इसमाचा मृत्यु...

रामटेक | एस.टी. च्या चाकाखाली येवुन इसमाचा मृत्यु…


रामटेक – राजू कापसे

रामटेक दिनांक ८ फेब्रुवारी रोज गुरुवारला सकाळी 09.30 दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या एस.टी. चा धक्का लागल्याने व एस.टी. चे चाक अंगावरून गेल्याने इसमाचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना हिवरा बाजार – रामटेक मार्गावरील पिन्डकापार ( सोनपुर ) गावाजवळ घडली.

पोलीस स्टेशन रामटेक येथुन मिळालेल्या माहितीनुसार रमेश बकाराम पानसे वय 58 वर्ष रा. पिंडकापार असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या पायाच्या उपचारा करीता रामटेक येथे जात असताना बस क्र MH 40 N 8578 चा चालक प्रीतमसिंग सदाशिव उके वय 51 वर्ष रा. कांद्री ता पारशीवणी याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालविल्याने मृतकास धक्का लागला व मृतकाच्या अंगावरून बसचा चाक जाऊन गंभीर होऊन त्याचा मृत्यु झाला.

फिर्यादी महेश रमेश पानसे वय 23 वर्ष रा.पिंडकेपार याच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्ट रामटेक येथे अप क्रमांक 98/20240कलम 279,338,304(अ) भा. द.वी. अनवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासणी पो.उप. निरीक्षक कार्तिक सोनटक्के हे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments