Thursday, May 9, 2024
Homeराज्यरामटेक | घाटपेंढरी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

रामटेक | घाटपेंढरी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

रामटेक:- घाटपेंढरी, ता.पारशिवनी येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप घाटपेंढरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते.साई विजन केअर एंड ऑप्टिकलस येथिल तज्ञ डॉ. राहुल ताकोद यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ पतासणी करण्यात आली.

या शिबिरात एकूण-२०२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२५, औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं-१९ व चष्मे करिता १५८- लाभार्थींनी लाभ घेतला. या कार्यक्रम प्रसंगी श्री.शंकरजी मसराम, श्री.धनराजजी उईके, श्री.संजूजी धूर्वे, श्री.अंनतरामजी उईके, श्री.संतोषजी पहाडीया, श्री.भागोजी अडमाची, श्री.दिनेशजी परतेती, श्री.रामकिशनजी अडमाची, श्री.ललितजी घंगारे, श्री.गौरव पनवेलकर, श्री.हर्षिद घंगारे, श्री.सुमित कामड़े व समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: