Monday, December 11, 2023
Homeराज्यरामटेकात भगिनी मंडळाच्या रास गरब्याची धूम...१ लाख रुपयाच्या बक्षीससांची लयलूट...

रामटेकात भगिनी मंडळाच्या रास गरब्याची धूम…१ लाख रुपयाच्या बक्षीससांची लयलूट…

Spread the love

रामटेक – राजु कापसे

नवरात्रीच्या पर्वावर रामटेक भगिनी मंडळ आणि बिग बॉईज टीम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रामटेक रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये दररोज आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत.आगामी तीन दिवसांत आकर्षक गरबा नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने अंदाजे एक लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण होणार आहे.

सायंकाळी 7 ते 10 या वेळेत शेकडो आकर्षक वेशभूषा केलेल्या महिला, तरुण-तरुणी डीजेच्या तालावर बेधुंद नाचत आहैत.यामध्ये दररोज उत्कृष्ट नृृृृृत्य करणार्‍या महिला, मुले व मुलींना तसेच आकर्षक वेशभूषा परिधान करून नृृृृृत्य करणार्‍यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व स्मृतीचिन्ह देण्यात येत आहेत.

खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, उदयसिंग यादव, दुधराम सव्वालाखे, डॉ.रामसिंग सहारे, विशाल बरबटे, गोपी कोल्लेपारा, अनिल वाघमारे,राजेश शाहू, गजू महाजन, संजय बिसमोग्रे , महेश बरगट , अलंकार टक्कामोरे सजल टक्कामोरे,

एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार डॉ.हंसा मोहने, पोलीस स्टेशन अधिकारी हृदयनारायण यादव यांना अतिथी म्हणुन गरब्यास्थळी बोलाविण्यात आले. यांच्या हस्ते वेगवेगळ्या दिवशी महा आरती करण्यात येऊन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गरब्याच्या रामटेक भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.ज्योती कोल्लेपारा, शोभा अडामे , मीनल भारंबे,

अर्चना वाघमारे, लता कामले, कांचनमाला माकडे, जोत्स्ना आकट, सुरेखा उराडे, लक्ष्मी बघेले, करुणा रोकडे, शारदा आकट, प्रीती मोहरे, नीता दुबे, सविता बांते, संध्या शिंगाडे, मेघा ठाकरे, कुंदा वांढरे प्रयत्नशील आहेत.

बिग बॉईज टीम चे अपूर्वा कोल्लेपरा, अंशुल बघेले, राज मेश्राम, गुलशन चौहान, लक्ष्मी चौहान, पंखू राऊत, आर्यन कोल्लेपरा सहित युवक प्रयत्न करत आहेत. दसर्‍याच्या पर्वावर गरब्याच्या अंतीम दिनी विजेत्यांना बक्षिस वितरीत करण्यात येणार आहेत.


Spread the love
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: