Sunday, May 12, 2024
Homeराज्यप्रश्नमंजूषा स्पर्धा - २०२४ वर्ष ८ वे…शिक्षक डॉ.पवन कामडी यांच्यातर्फे आयोजन...

प्रश्नमंजूषा स्पर्धा – २०२४ वर्ष ८ वे…शिक्षक डॉ.पवन कामडी यांच्यातर्फे आयोजन…

Share

विजेत्या गटाला बक्षिसाच्या स्वरूपात सन्मानचिन्ह सहभागी गटातील विद्यार्थ्यांना भेट म्हणून ग्रंथप्रश्नमंजूषा स्पर्धा – २०२४ वर्ष ८ वे…

रामटेक – राजु कापसे

नगरधन येथील स्व.इंदिरा गांधी विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळेतील शिक्षक श्री.पवन देवीदास कामडी यांच्यातर्फे ‘प्रश्नमंजूषा स्पर्धेचे’ आयोजन नुकतेच (२६ फेब्रुवारीला) करण्यात आले होते. स्पर्धेचे हे ७ वे वर्ष होते. शाळेतील शिक्षक डॉ. पवन कामडी हे शाळेतील फलकांवर वर्षभर सामान्य ज्ञान लिहितात.

त्यांवर आधारित तसेच अभ्यासक्रमातील व इतर सामान्य ज्ञानाचे प्रश्न एकत्रित करून अशा प्रश्नांनीयुक्त प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतात.स्पर्धेत ३ गट राहतात.प्रत्येक गटात वर्ग ५ वी ते १० वी पर्यंतचे प्रत्येकी १-१ असे एकूण ६ विद्यार्थी असतात…यावर्षी गटांना ‘भारत’,’हिंदोस्ता’ व ‘इंडिया’ अशी नावे देण्यात आली होती.

‘भारत’ या गटात वर्ग ५ वी ते १० वीतील अनुक्रमे कार्तिक हरनाम पटेल,प्राप्ती गणपत देशमुख,कृतिका दिनेश पडोळे,स्मृती नरेश माहुले,भारती जियालाल दमाहे,नेहा महेंद्र धोपटे हे विद्यार्थी सहभागी होते..’हिंदोस्ता’ या गटात ५ वी ते १० वीतील अनुक्रमे मयंक कार्तिक ईश्वरकर, श्रेयस संतोष मानकर,भावेश अंगद बांगडे,अंश गजानन खंडारे,

सोनाली गोपाल वंजारी,वैभव विलास भिवगडे हे विद्यार्थी सहभागी होते. तर ‘इंडिया'(INDIA) या गटात ५ वी ते १० वीतील अनुक्रमे प्रज्ञदीप सचिन दुपारे, अनुष्का विजय तरारे,श्रावणी महेंद्र धोपटे,श्रेयस अंकुश बावनकुळे,मानसी रामेश्वर मेंघरे,साक्षी रंजित बिरणवार हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धेत संपूर्ण ४ फेरीत सर्वाधिक गुण प्राप्त करून विजयी ठरलेल्या ‘हिंदोस्ता’ या गटातील मयंक ईश्वरकर, श्रेयस मानकर,भावेश बांगडे,अंश खंडारे,सोनाली वंजारी,वैभव भिवगडे या विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू म्हणून देऊन गौरविण्यात आले..सहभागी स्पर्धकांना भेट स्वरूपात ग्रंथ देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.छमेशकुमार पटले हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन स्पर्धेचे आयोजक शिक्षक डॉ.पवन देवीदास कामडी यांनी केले..स्कोररची भूमिका कु.श्रेया राऊत व रियांशा ढोके यांनी पार पाडली तर टाईमकिपरची भूमिका सौ.विद्या मून मॅडम व कु.निशा गौळीवार मॅडम यांनी पार पाडली.कार्यक्रमाला सौ.मते मॅडम,श्री.हजारे सर,श्री.पुरे सर, श्री.जाधव सर,श्री.विकास कामडी,श्री.ज्ञानेश्वर कामडी यांनी व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले…


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: