Thursday, April 25, 2024
Homeराज्यपुंडलिक बाबांच्या पालखीचे गजानन मदिरात स्वागत...

पुंडलिक बाबांच्या पालखीचे गजानन मदिरात स्वागत…

Share

जनरल सर्जन डॉ. हरीश पातोंड यांचाही झाला मान्यवरांच्या हस्ते सत्कार

मूर्तिजापूर ,ता.१७ : परमहंस संत श्री पुंडलिक महाराजांच्या श्री क्षेत्र गोरेगाव ते देवाचे गुरू श्री मुंगसाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र धामणगाव (देव) पालखीचे आज येथील नविन पटवारी कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदीर परीसरात स्वागत व तालुक्यातील पहिले गोरेगावचे पुंडलिक बाबांचे नातु वैद्यकीय शास्त्रातील पदव्यूत्तर पदवी (एम.एस) प्राप्त डॉ.हरीश वासुदेवराव पातोंड यांचा सत्कार करण्यात आला.

हा पालखी सोहळा गत ता. १० मार्चला गोरेगाव येथुन प्रस्थान करून ता.१५ मार्च ला धामणगाव (देव) येथे पोहचला होता. परतीच्या प्रवासादरम्यान पालखी सोहळ्याचे आज येथे आगमन झाल्यावर येथील नवीन पटवारी कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात पालखीचे स्वागत करण्यात आले. डॉ. हरीश वासुदेवराव पातोंड MBBS (GMC Nagpur)

M.S.(General surgery) (GMC Latur) FIAGES (Fellowship in Laparoscopy bhopal) जनरल सर्जन यांचा सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र अमोल प्रजापती व नविन पटवारी कॉलनीतील मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व बालवृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: