Friday, May 3, 2024
Homeराजकीयखोके घेवून फितूर झालेले गद्दार आज शिवसेनेच्या मुळावर उठले...सुषमाताई अंधारे

खोके घेवून फितूर झालेले गद्दार आज शिवसेनेच्या मुळावर उठले…सुषमाताई अंधारे

Share

हेमंत जाधव

खामगावात भव्य जाहीर सभा, भाजपसह शिंदे सरकारवर हल्लाबोल

खामगाव गेल्या सात आठ महिन्यांपासून सत्तेचा जो गैरवापर चालु आहे तो तुम्ही अघड्या डोळ्यांनी बघत आहात. आज राज्यात गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता आहे परंतु हे काही नवीन नाही. यापुर्वी काँग्रेसची सुध्दा सत्ता देशात होती.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असताना आणि काँग्रेस तसेच शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वैमनस्व देखील जनतेस सर्वश्रृत होते. तसेच अनेक जण त्या काळात शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र त्यातील एकही जण शिवसेनेच्या मुळावर उठला नव्हता, कोणीही शिवसेना संपविण्याची भाषा केली नाही. परंतू, आज ज्यांच्या जिवावर मोठे झाले तेच एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे गद्दार फितूर होवून शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत.

खोके घेवून गद्दार झालेल्यांनी कितीही हल्ला केला तरी ठाकरेंचा किल्ला हा मजबूत आहे, असे सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेेत्या सुषमा अंधारे यांनी खामगाव येथील जाहीर सभेत भाजप, शिंदे सरकार तसेच जिल्ह्यातील मिंदे गट व जिल्ह्यातील अामदारांवर हल्लाबोल करीत त्यांचा समाचार घेतला.

शिवगर्जाना सप्ताहानिमित्त सध्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते महाराष्ट्र भर दौरे करीत असून, शिवसेना नेत्या सुभषा अंधारे या विदर्भ दौऱ्यावर असून आज दि.१ मार्च रोजी खामगाव येथील गांधी चौकात सायंकाळी ५ वाजता त्यांची जाहीर सभा झाली.

यावेळी त्या शिवसैनिकांना संबोधित करीत होत्या. यावेळी मंचावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील लोहबन्धे साहेब नांदेड़ समन्वयक , जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, जालींधर बुधवत, शिव उद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तायडे उपजिलाप्रमुख अविनाश दलवी शेगाव तालुकाप्रमुख दत्ता वाघमारे रविभाऊ भोजने युवासेना उपजिलाप्रमुख आशीष रहाटे , शिवसेना तालुका अध्यक्ष बंडु बोदडे, खामगाव विधानसभा संघटक रवि महाले,

शहर प्रमुख विजय इंगळे, कृउबासचे माजी संचालक श्रीराम खेलदार यांचेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, माजी नगराध्यक्ष गणेश माने, अशोक हटकर वंचित बहुजन आघाडीचे महिलाजिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग जेष्ठ शिवसैनिक भीकुलाल जैन सुभाष ठाकुर गौतम गवई उद्योजक व जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिंधे असून, राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या राज्याची अस्मिता असलेल्या अनेक महापुरुषांबद्दल अपशबद्दल काढले परंतू, शिंदे त्यांच्या विरुध्द कधीच काही बोलले नाही. भाजपसोबत गेलेल्या सर्व चाळीस आमदारांची काही ना काही गोम आहे. त्यामुळे ते केवळ फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करतात. मग ते महाराष्ट्राच्या हिताचे असो वा नसो.

अंधारे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर व संजय गायकवाड यांच्या बद्दल बाेलतांना म्हणाल्या की, या तिघांना मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याला खोक्यांच्या ओळखीशी जोडले असून, यांना जनता कधीही माफ करणार नाही. सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतांना हे चुन चुन के मारेंगे ची भाषा करतात. तर खासदार म्हणतात महागाई कुठे वाढली खर्च वाढला आहे.

त्यामुळे या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. भाजप व शिंदे सरकार सर्व निवडणुका पुढे लोटत असून त्यांना सरकार पडण्याची भिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे सरकार कोसळून २०२३ मध्येच निवडणुका लागतील. त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहनही त्यांनी केले. या सभेला खामगावसह जिल्हाभरातून शेकडो शिवसैनिक व खामगावकर उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन रविभाऊ महाले तर आभार प्रदर्शन विजय इंगले यानी केले सभा यशस्वी होण्याकरिता युवासेना तालिकाप्रमुख धीरज कंठाले शहर प्रमुख सन्तोष सावंग शंकर खराडे विजू बोरडे सन्तोष करे आनंद चिंडाले सृतिताइ पतंगे तारापुरे ताई चिलवन्त ताई खराडेताई श्रीराम खेलदार प्रकाश महाजन तथा सर्व शिवसैनिकानी परिश्रम घेतले


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: