Saturday, May 4, 2024
Homeराज्यकाँग्रेस खासदार, युवक नेते इम्रान प्रतापगडी यांची आज जाहीर सभा...

काँग्रेस खासदार, युवक नेते इम्रान प्रतापगडी यांची आज जाहीर सभा…

Share

अकोला – काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मित्र मानल्या जाणारे तथा “चाय बेचने वाला पूरा भारत बेच रहा है” या गीताने संपूर्ण देशात लोकप्रिय झालेले शायर खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या जाहीर सभेचे आयोजन महानगरात करण्यात आले आहे.

आज सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता गडांकी रोड येथील मैदानात खा इम्रान प्रतापगडी यांची जाहीर सभा होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय काशिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ इमरान प्रतापगडी हे अकोला महानगरात येत असून त्यांच्या विविध सभा अकोला महानगरात आयोजित करण्यात आल्या आहेत.

युवा विश्वात प्रचंड लोकप्रिय असणारे इम्रान प्रतापगडी हे मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्या पुढाकाराने आयोजित डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रचार सभेत युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: