Homeराज्यनाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा...माजी पालकमंत्री अंबरीश राव यांना नागरिकांचे...

नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा…माजी पालकमंत्री अंबरीश राव यांना नागरिकांचे निवेदन…

Share

अहेरी – मिलिंद खोंड

आलापल्ली येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये नाल्याच्या पुरामुळे अनेकदा नुकसान झाले आहे त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याची दिशा बदलवण्याची मागणी वार्ड क्र.6मधील नागरिकांनी माजी पालकमंत्री अंबरीश राव यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की आम्ही आलापल्ली येथील चाळीस वर्षापासून स्थायी रहिवासी आहोत आमच्या वार्डालगत नाला असून दिवसेंदिवस येणाऱ्या पुरामुळे या नाल्याचे पात्र विस्तारत आहे दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याला येणाऱ्या पुरामुळे आमच्या वार्डात व घरात पुराचे पाणी शिरते त्यामुळे घरातील साहित्य, जनावरे धान्य व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसाना पासून वाचण्यासाठी वन विभागाकडून नाल्याची दिशा बदलून देऊन प्रवाह दुसरीकडे वळवावा. त्यामुळे या वॉर्डातील घरांचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही. यावेळी निवेदन देताना माजी जीप सदस्य विजया विठ्ठलानी,सुरेखा सॅन्ड्रा,संगीता कोहपरे,सुरेखा धानोरकर,सावित्री भिमोजवार,

सुनंदा भीमनपल्लीवार,बंडू धानोरकर,शकुंतला श्रीरामवार, सुशीला आत्राम,माया बासनवार,सोनी मडावी,बानू आत्राम,रामबाई शिवनेरी,रिना रास पुडिवार, इंद्रायणी बोमेनवार, सुरेखा येरमे,रवी रासपुडिवार,मनिषा सॅन्ड्रा, सरिता बंडावार आदींची उपस्थिती होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: