Thursday, May 2, 2024
Homeशिक्षणप्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात...

प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा…

Share

महिला प्रबोधनकार तयार होने काळाची गरज – वक्त्त्यांचे सूर

रामटेक – राजू कापसे

गुरुदेव राष्ट्रीय विकास संस्था द्वारा संचालित प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक द्वारा प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून जयंती उत्सव व स्नेहसंमेलन शहरातील शांती मंगल कार्यालय रामटेक येथे १७ व १८ सप्टेंबर २०२२ या दोन दिवशी आयोजित करण्यात आले.

१७ सप्टेंबरला या जयंती उत्सव व स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून सौ. वंदना सवरंगपाते उपविभागीय अधिकारी रामटेक, प्रा.डॉ. अभिविलास नखाते संस्थापक-अध्यक्ष गुरुदेव राष्ट्रीय विकास संस्था कोराडी, प्रमुख अतिथी ज्ञानेशजी वाकुडकर कवी लेखक तथा अध्यक्ष लोकजागर,

राजूजी बर्वे प्राचार्य राष्ट्रीय आदर्श कनिष्ठ महाविद्यालय रामटेक, नरेंद्रजी बंधाटे पं.स. सदस्य रामटेक, शैल जैमिनी कडू सामाजिक कार्यकर्त्या नागपूर, बर्वे सर भालेराव कॉलेज सावनेर, नंदकिशोर अलोने, राऊत सर सामाजिक कार्यकर्ते, ‘निर्भीड’ वृत्तपत्र संपादक , संदीप उरकुडे (शिक्षक) श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, महादुला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य,प्रा. डॉ. सुरेश भागवत यांनी केले तर या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. मुक्ता रोकडे आणि प्रा. छाया वांढरे यांनी केले आणि आभार प्रा. संतोष ठकरेले यांनी मानले. या जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने प्रबोधनकार महिला महाविद्यालयाद्वारा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन, नृत्य, अभिनय, पोवाडा सादरीकरण, वेशभूषा, पथनाट्य, नाटक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या विविध स्पर्धांच्या परीक्षण करण्याकरिता डॉ.जगदीश गुजरकर, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, रामटेक, माधुरीताई उईके माजी नगराध्यक्ष रामटेक, सौ. जया राठोड जि.प. शिक्षिका, श्रावणजी टेकाडे मुख्याध्यापक जि.प. शाळा महादूला, विप्लव राणे, डान्स कोरिओग्राफर, रामटेक, आदींनी अतिथींची आणि पर्यवेक्षकांची भूमिका पार पाडली.

दुसऱ्या दिवशी १८ सप्टेंबर २०२२ ला बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप यांचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमात १७ सप्टेंबरला विविध स्पर्धांमध्ये आपल्या कलागुणांचा प्रदर्शन करणाऱ्या आणि पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात सामाजिक गीतांवर आधारित ऑर्केस्ट्रा नागपूर येथील ऑर्केस्ट्रा चमुने सादर केला तर “राष्ट्रशिक्षिका” हा एकपात्री नाट्यप्रयोग सामाजिक कार्यकर्त्या, चित्रपट, दूरदर्शन कलावंत व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व सौ. शैल जैमिनी कडू,नागपूर यांनी सादर केला आणि तुषारजी सूर्यवंशी, राष्ट्रीय विनोदी प्रबोधनकार, दूरदर्शन झी.टी. व्ही. कलावंत यांनी सप्तखंजेरीचा कार्यक्रम सादर केला.

या बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप कार्यक्रमात संजय दुधे, प्र-कुलगुरु रा.तु.म.नागपूर विद्यापीठ, प्रा. अभिविलास नखाते,संस्थापक-अध्यक्ष, सौ.सुनिता नखाते, संचालक, शिवतीर्थ पिकनिक स्पॉट, अभियंता नरेंद्रजी गद्रे, संस्थापक-अध्यक्ष, डॉ. अब्दुल कलाम महाविद्यालय, नेर, जि. यवतमाळ, सौ.अनघा गद्रे अध्यक्ष, नेर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,नेर, जि. यवतमाळ, राजेशजी राठोड समतादूत (बार्टी),

पुणे, प्रशांत कामडी सरपंच नगरधन , दीपक गिरधर, पत्रकार,माजी प्राचार्य, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, रामटेक , दीपक मोहोड प्राचार्य नंदीवर्धन कनिष्ठ महाविद्यालय नगरधन, अजय मेहरकुळे, सर्पमित्र,सामाजिक कार्यकर्ता,रामटेक, राहुल कोठेकर सर्पमित्र, सामाजिक, कार्यकर्ता,रामटेक प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अपूर्वा हारगुडे व प्रा.अश्विनी डाखोळे यांनी केले.

या दोन दिवसीय जयंती उत्सव व स्नेहसंमेलनामध्ये पुस्तकांची प्रदर्शनी लावण्यात आली होती हे विशेष. या दोन दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थिनी ,पालकवर्ग पत्रकारवर्ग, तालुक्यातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. प्रभाकर बागडे प्रा.सुहाना खान प्रा.कल्याणी कुंभलकर, प्रा. संतोष ठकरेले, सचिन डोनारकर, जोगेंद्र सूर्यवंशी, ऋतिका देशमुख, सपना मेश्राम आदी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग व विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम घेतले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: