Monday, February 26, 2024
Homeराज्यरामधाम येथे प्रभुरामचंद्र मुर्तीची प्राण प्रतिष्ठा व महाआरती...

रामधाम येथे प्रभुरामचंद्र मुर्तीची प्राण प्रतिष्ठा व महाआरती…

Share

रामटेक – राजु कापसे

२२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला अयोध्या येथे होत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा समारोह सोहळ्यानिमित्त रामधाम तीर्थ येथे येथे भव्य महाआरती, हळदीकुंकू कार्यक्रम, एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण व दिवसभर भजन, कीर्तन, अभिषेक, हवन कार्य झाल्यामुळे पूर्ण रामधाम हे राममय झाले.

पूर्ण मंदीर परीसर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. रामभक्ततांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मा.श्री. चंद्रपाल चौकसे (पर्यटक मित्र / संस्थापक रामधाम तीर्थ (मनसर), सौ. संध्या चंद्रपाल चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ (मनसर) यांचा उपस्थितीत करण्यात आले.

त्यानंतर रामधाम मध्ये आलेल्या महीलाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सौ संध्या चौकसे यांनी आलेल्या स्त्रियांना हळदीकुंकु सह तिळगुळ व वाण देण्यात आले. महीलांनी उखाने घेत नृत्य सादर करुन आनंद साजरा केला.

कार्यक्रमाला सुमारे ४ महीलांनी हजेरी लावली. कार्यक्रमा यावेळी श्री दयाराम रॉय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रा. प्र. स. संघटना, सौं रश्मीताई बर्वे माजी अध्यक्ष जी प नागपूर, सदस्य जी प नागपूर, करूनताई भोवते उपसभापती पारशिवनी, सौं कलाताई ठाकरे माजी सभापती सदस्य पं. स. रामटेक, श्री. पी. टी .रघुवंशी, श्री. नितीन भैसारे, बबलू दुधबर्वे, सौं शारदाताई बर्वे,

सौं विदयाताई चिखले माजी सरपंच, सौं शोभाताई राऊत, सौं माकडे मॅडम, अजय खेडरकर, अमोल खडतकर, राजेश नागपुरे, शिवराम महाजन, कैलास चिंतोळे, बाळा बडवाईक, मोहन कोठेकर, धर्मेंद्र दुपारे, सौं. रंजनाताई मस्के, नथुजी घरजाळे साक्षीताई चौकसे, योगेश्वरीताई चोखाद्रे माजी सरपंच, लताताई पद्माकर, अर्चना अमृतकर, कोमल घवघावे,

स्वेता दूधबर्वे, राधाबाई यादव, ज्योती ताई राऊत अर्चना पेटकर, तुळसाबाई महाजन, मंदाताई कुलरकर, शोभाताई अडामे, यशोदा रहांगडाले, ललिता धंधोलकर, जयश्री मालघाटे, गौतमा राऊत, पुष्पा बर्वे,यशोधरा लांजेवार, सोनल मुदलीयार,समस्त महिला भगिनी व समस्त भक्तगन मोठ्या संख्येने उपस्तित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: