Monday, May 6, 2024
Homeराज्यजुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई...

जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई…

Share

पातूर – निशांत गवई

पैशाच्या हारजितवर जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळून जुगाराचे साहित्य, मोबाईल नगदी रक्कम असा एकुण १४ हजार २७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शेख रफिक शेख रहेमान ,सदाशिव बुलबुले , फिरोज खान रशीद खान,नागेश बळीराम गवई अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विजय टॉकीज परिसरात बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुल राज जी यांच्या पथकासह पातूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चौघांविरुद्ध जुगार कायद्यानुसार पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुल राज जी व त्यांच्या पथकातील सहा. पोलीस निरीक्षक विनोद घुईकर,पोलीस कर्मचारी रशीद,विठ्ठल उकर्डे,गजानन शिंदे,संतोष सोळंके,शेख कबीर यांच्यासह पातूर पोलिसांनी केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: