Thursday, May 2, 2024
Homeराज्यरामटेक सकाळ समुह आणि सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था यांचा तर्फे ५० झाडांचे...

रामटेक सकाळ समुह आणि सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था यांचा तर्फे ५० झाडांचे वूक्षारोपण…

Share

रामटेक – राजू कापसे

समर्थ शाळेच्या प्रांगणात ५ जून रोजी सकाळ समुह आणि सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विधमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन‌ करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने रामटेक शहरातील समर्थ शाळा,समर्थ काॅंन्व्हेंट येथे बुधवारी सकाळी ८ वाजता डाॅक्टर तसेच शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थीत भव्य वूक्षारोपण करण्यात आले. जांभुळ, चिचवा, कडुनिंब, चिंच आणि विविध प्रकारचे ५० झाडे लावण्यात आले.

यावेळी सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष ऋषीकेश किमतकर, डाॅ.बापू सेलोकर,वसंतराव डांमरे,राजेश बाकडे,भुषण देशमुख,विनोद शेंडे,नामदेव राठोड,पराग पंडे,रवि मथुरे,मानद सेलोकर,श्रीपती देशमुख,पराग किमतकर,सकाळ समुहाचे राजु कापसे,नागपूर वितरण विभागाचे विजय चरडे,जगदिश सांगोडे सह आदी मान्यवर उपस्थीत होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: