Sunday, April 28, 2024
Homeराज्यआकोट येथे शांतता समितीची सभा संपन्न…आगामी काळात येणारे सण व निवडणुका शांततेने...

आकोट येथे शांतता समितीची सभा संपन्न…आगामी काळात येणारे सण व निवडणुका शांततेने पार पाडण्याचे आवाहन…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट शहर पोलीस स्टेशन येथील सावली सभागृहामध्ये आगामी गणेश उत्सव ईद व येणार्‍या निवडणूका संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे अकोला यांचे अध्यक्षतेखाली, आकोट शहरातील शांतता समिती सदस्य व गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तथा ईद-ए-मिलादुन्नबी मंडळाचे अध्यक्ष यांचे उपस्थितीत शांतता समितीची सभा संपन्न झाली.

यावेळी पोलीस अधिक्षक यांनी गणेश मंडळ व ईद-ए-मिलादुन्नबी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व बैठकीला उपस्थितील शांतता समिती सदस्य यांना शहरात शांतता अबाधीत ठेवण्याचे आवाहन केले.

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट फॉरवर्ड करू नये. तसेच कोणतीही अनुचीत घटना आढळुन आल्यास पोलीसांना संपर्क करावा. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

त्यासोबतच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगर परीषद व इतर विभागांकडुन मिरवणुक मार्गातील अडवाणी दुर करण्यात येतील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. शांतता समिती बैठकीला अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी आकोट बळवंत अरखराव, उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट रितू खोखर,

तहसीलदार सुनील चव्हाण, महावितरण विभागाचे अनसींगकर, नगर परीषद अधिकारी उपस्थितीत होते. तसेच ग्रामीण विभागामधुन सुध्दा शांतता समिती सदस्य व शगणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.या सभेनंतर पोलीस अधिक्षक यांनी आकोट शहरातील गणेश मिरवणुक मार्ग व ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: