Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीपातुर मराठी पत्रकार संघाने केला पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध...

पातुर मराठी पत्रकार संघाने केला पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध…

Share

पातुर तहसीलदार आणि ठाणेदार यांना दिले निवेदन…

निराधार झालेल्या वारीशे कुटुंबाला एक कोटीची मदत शासनाने द्यावी…

हत्या करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अन्यथा करावे लागेल आंदोलन…

पातुर – निशांत गवई

राज्यभरात पत्रकारिता करणाऱ्या सर्व स्तरातील पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केल्या जात असून त्यांच्यावर हल्ले व खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायला टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण होत असून यामुळे पत्रकारात भीतीची भावना निर्माण होत आहे.

याच अनुषंगाने कोकणातील महानगर टाईमचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे आपल्या दुचाकी ने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्र धार गाडीने त्यांचा प्राण घेतला शशिकांतने ज्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कार चालक यांच्या वाहनाने हा अपघात केला आहे हत्येच्या निषेधार्थ पातुर येथील पत्रकारांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत चौकशीची मागणी केली असून अपघात करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी आणि निराधार झालेल्या वारीशे कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी मागणी सुद्धा पातुर येथील पत्रकारांनी केली आहे.

यावेळी पातुर चे नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे तसेच पातुर पोलीस उपनिरीक्षक मीरा सोनूणे यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे या निवेदन देणाऱ्यांमध्ये गणेशराव सुरजुसे , अध्यक्ष अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ, देवानंद गहिले पातुर तालुका अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, श्रीधर लाड तालुका उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ, संजय गोतरकर कार्याध्यक्ष पातुर तालुका मराठी पत्रकार संघ, तसेच रमेश देवकर,

निशांत गवई अध्यक्ष बहुजन पत्रकार संघ, दुलेखान युसुफ खान बहुजन पत्रकार संघ, सय्यद हसन बाबू, नामदेव जाधव, गोपाल बदरके ,जुबेर शेख, राहुल सोनूणे ,अमोल देवकते, प्रेमचंद शर्मा ,सुधाकर राऊत, अब्दुल कदिरभाऊ, नय्यर खान उर्फ गुड्डू भाई, बाबूलाल सुरवाडे ,गोपाल जोशी , रमेश नीलखन, विजय तेलगोटे, चिंधाजी गुडदे, सुखलाल ऊपरवट, निखिल इंगळे, इरफान अहमद शेख पत्रकार सुरक्षा जनक कौन्सिल तालुकाध्यक्ष आदी मान्यवर पत्रकारासह पातुर शहर तसेच पातुर तालुक्यातील पत्रकारांची बहुसंख्य उपस्थिती यावेळी होती.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: