Wednesday, May 1, 2024
Homeगुन्हेगारीPatna Accident | बिहारच्या पाटणा येथे भीषण अपघात...जेसीबी आणि ऑटोच्या धडकेत ७...

Patna Accident | बिहारच्या पाटणा येथे भीषण अपघात…जेसीबी आणि ऑटोच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू…एक गंभीर..

Share

Patna Accident : बिहारमधील पाटणा येथे एक वेदनादायक अपघात (Patna Road Accident) घडला आहे. जेसीबी आणि अनियंत्रित ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही हृदय पिळवटून टाकणारी घटना पाटणातील कांकरबाग पोलीस स्टेशन हद्दीतील रामलखान पथ येथे मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका अनियंत्रित ऑटोने पाटणा मेट्रोसाठी काम करणाऱ्या जेसीबीला थेट धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा तपास सुरू आहे. पाटणा येथे झालेल्या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: