Homeशिक्षणमुतिजापूर | स्व.रामदासभैय्या दुबे इंग्रजी शाळेत स्व.भोलाशंकर गुप्ता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्य...

मुतिजापूर | स्व.रामदासभैय्या दुबे इंग्रजी शाळेत स्व.भोलाशंकर गुप्ता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन…

Share

मुतिजापूर तालुका प्रतिनिधी.

मुतिजापूरातील व्यावसायिक तथा समाजसेवक संजय भोलाशंकर गुप्ता यांनी आपल्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपरिषद शाळा आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल स्व.रामदासभैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा मूर्तिजापूर या शाळेत १३ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता स्व. भोलाशंकर हिरालाल गुप्ता यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना संजय भोलाशंकरजी गुप्ता यांच्याकडुन शाळेला शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा आमदार हरीशभाऊ मारोती आप्पा पिंपळे मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघ तसेच मा. द्वारकाप्रसादजी दुबे माजी नगराध्यक्ष, संजय भोलाशंकर गुप्ता समाजसेवक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम शाळेत होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेवक संजय भोलाशंकर गुप्ता यांनी लेखी स्वरूपात केले आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: