Homeकृषीसावरगाव येथे शंकरपट व कृषी प्रदर्शनी चे आयोजन...

सावरगाव येथे शंकरपट व कृषी प्रदर्शनी चे आयोजन…

Share

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे शंकरपट समिती, जिल्हा परिषद नागपूर, पंचायत समिती नरखेड व राणी लक्ष्मीबाई कृषीतंत्र विद्यालय, सावरगाव यांच्या सौजन्याने दिनांक 12 व 13 मार्च ला शंकरपट व कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्या जात आहे.

शंकरपट व कृषी प्रदर्शनाचे मुख्य आयोजक श्री सतीश शिंदे माजी कृषी सभापती जि. प. नागपूर यांनी सांगितले की, या दोन दिवसाच्या अभूतपूर्व सोहळ्याला नरखेड व काटोल तालुक्यातील एकूण 30 हजार शेतकरी बांधवांचा जनसागर उपस्थिती दर्शवितो आणि उत्साहाने एखाद्या सणा सारखा साजरा करतात. माजी आमदार स्व. सूनिलबाबु शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या शंकरपटाला 71 वर्षाची अखंड परंपरा आहे.

या वर्षी शंकरपटाच्या बक्षिसांची किमंत दीड लक्षावरून वाढवून एकूण ३,५०,००० ₹ पर्यंत केलेली आहे. या शंकरप टात एकूण दोन गट केलेले असून अ गटात हा खुला गट असून या गटात कुठल्याही बाहेरील बैलजोडी ला भाग घेता येईल तर ब गट हा नरखेड व काटोल तालुक्यातील बैल जोड्यांसाठी राखीव आहे.

या पटाचे वैशिष्ट म्हणजे या शंकरपटा मध्ये बैलांना हाकण्याकरिता तुतारी, काठी किंवा इतर कुठल्याही शस्त्राचा उपयोग करता येत नाही. पटाची ही परंपरा शासन निर्णय होण्याच्या अगोदर पासून असल्याचे पटाचे मुख्य आयोजक श्री सतीश शिंदे यांनी सांगितले. शंकरपटाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष काटोल विधान सभेचे आमदार श्री अनिल देशमुख आहेत. तसेच या शंकरपटाचे उद्घाटक सावनेर विधान सभेचे आमदार श्री सुनील केदार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला श्री प्रवीण जोध, कृषी सभापती, जि. प. नागपूर, बक्षीस वितरणा च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू पं. कृ. वि. अकोला तर प्रमुख पाहुणे सौ. मुक्ताताई कोकार्डे, अध्यक्ष, जि. प. नागपूर आणि श्री सलील देशमुख सदस्य जि. प. नागपूर यांच्या प्रमुख उपस्थित बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
मान. श्री डॉ.शरद निंबाळकर, माजी कुलगुरू पं. कृ. वि. अकोला हे उपस्थित शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शंकरपट आणि कृषी प्रदर्शनी च्या नेत्रदीपक सोहळ्याला
श्री अभिजित वंजारी, आमदार विधान परिषद
श्री समीर मेघे, आमदार हिंगणा विधान सभा
श्री राजेन्द्र मुळक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य
श्री सुरेश आरघोडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड
श्री महेन्द्र गजबे सभापती, पंचायत समिती, नरखेड
राजुभाऊ हरणे, जिल्हा अध्यक्ष शिवसेना (ठाकरे गट)
श्री नरेशभाऊ अरसडे माजी सभापती, पं. स. नरखेड
श्री समीर उमप, सदस्य जि. प. नागपूर
श्री संदीप सरोदे, सदस्य जि. प. नागपूर
श्री हंसराज गिरडकर उप सरपंच ग्रा.पं. सावरगाव
श्री वेदप्रकाश आर्य, नागपूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
शंकर पट समितीचे अध्यक्ष श्री रमेश भाऊ रेवतकर, सचिव श्री पंकज मेटांगळे, श्री वैभव दळवी तसेच आयोजन समितीच्या सर्व मान्यवर मंडळींनी सर्व शंकरपट पटुंना व शंकरपट आवड असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी या शंकरपट आणि कृषी प्रदर्शन सोहळयात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: