Thursday, May 9, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | ट्रक व मोटारसायकल चा अपघातात एक गंभीर जखमी...

पातूर | ट्रक व मोटारसायकल चा अपघातात एक गंभीर जखमी…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील महामार्ग वर अपघाताचि श्रुखला थांबता थांबत नसून आज सकाळी 11 वाजता चे दरम्यान एका ट्रक ने मोटारसायकलस्वार युवकास गंभीर जखमी झाला याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर वाशीम मार्गांवर असलेल्या न्यू क्वालिटी ढाब्या समोर मेडशी कडून येत असलेला ट्रक क्रमांक MH 12 DT 7591 ने मोटारसायकल क्रमांक MH 28 N 3822 च्या मोटारसायकलस्वार अविनाश अवचार रा. वाडेगाव यास समोरासमोर धडक दिली असून अविनाश अवचार हा गंभीररित्या जखमी झाला घटनेचि माहिती मिळताच शहरातील पत्रकार दुले खा व किरण निमकंडे यांनी जखमीस तात्काळ प्रा. आ. केंद्रात आणून जखमी यास पुढील उपचारासाठी अकोला रवाना केले घटनास्थळी ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली हे. कॉ. घोंगे मेजर यांनी घटनास्थळ गाठले.

घटनास्थळी गंभीररित्या पडून असलेल्या अविनाश अवचार यास नागरिकांनि फक्त बघ्या चि भूमिका घेतली तथा कुणीही आपल्या वाहणाने जखमी यास उपचारासाठी नेत नसताना पत्रकार दुलेखा याने दगड उचलून एका ऑटो ला थांबवून जखमीला तात्काळ किरण निमकंडे सोबत उपचारासाठी घेऊन गेले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: