Sunday, May 5, 2024
Homeराज्यराष्ट्रीय महामार्गा वर झालेल्या अपघातात एक इसम ठार तर दोन जखमी..!

राष्ट्रीय महामार्गा वर झालेल्या अपघातात एक इसम ठार तर दोन जखमी..!

Share

गडचिरोली – मिलिंद खोंड

मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम गावा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम ठार तर दोघे जखमी झाले आहेंत. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. लगाम येथील हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकान बंद करुन सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास दुकान मालक
आनंद रॉय रा.रामपूर चेक यांच्यासह दुकानातील कामगार सुनिल गंगाराम ठाकरे रा.रामपूर चेक व गुड्डू दिवाकर पातर रा.ईल्लूर हे लगाम येथून अहेरी तालुक्यातील राजपूर पँच ग्रामपंचायत हद्दीतील रामपूर चेक येथे सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास MH-33-Q 1292 या दुचाकी वाहनाने स्वगावी वापस येत असतांना मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम गावा जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकी ला मागून धडक देऊन पसार झाला मात्र यात ईल्लूर येथील गुड्डू दिवाकर पातर याच्या जागीच मृत्यू झाला असुन सुनिल गंगाराम ठाकरे व आनंद रॉय हे दोखे जखमी आहे.

सुनिल गंगाराम ठाकरे याला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,साह्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक जंगले ,यांच्यासह आष्टी व अहेरी पोलीस स्टेशन ची चमू उपस्थित झाली घटनेचा पुढील तपास अहेरी व आष्टी पोलीस स्टेशन करीत आहेत..


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: