Monday, December 11, 2023
Homeराज्यजागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी येथे 'रन फॉर टायगर'...

जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी येथे ‘रन फॉर टायगर’ चे आयोजन…

Spread the love

रामटेक – राजु कापसे

पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘रन फॉर टायगर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिल्लारी गेट ते पवनी गेट पर्यंत ही धावस्पर्धा 7 किमी होती. लगतच्या गावातील सुमारे 150 तरुणांनी या धावस्पर्धेत सहभाग घेतला. यात सुमारे 30 महिलांचाही सहभाग होता.

श्री. आशिष जयस्वाल, आमदार, रामटेक मतदारसंघ यांनी या धावस्पर्धेची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून केली. भाषणादरम्यान श्री. जयस्वाल यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील लोकांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुमारे 50 वाघ असल्याचा अभिमान आहे.

ते सोबत म्हणाले की, पर्यावरण पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविका निर्माण करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल. त्यांनी सांगितले की या भागात कालव्याच्या सिंचनाला फारच कमी वाव असल्याने ते बोअरवेलसाठी प्रयत्नशील आहेत ज्यामुळे मनुष्यप्राण्यांचा संघर्षही कमी होईल. व्याघ्र संवर्धनाकरिता व्याघ्र भ्रमणमार्ग (corridor) महत्त्वावर त्यांनी भर दिला.

रन फॉर टायगर स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विकी राऊत याने पुरुषांमध्ये प्रथम तर कल्याणी टोंगे महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे प्रायोजक धनेश फाऊंडेशन, देवलापार यांनी केले. कार्यक्रमाला श्री. प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूर , श्री अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक (अशिप्रक), धनेश फाउंडेशनचे श्री स्मित गुप्ता, श्री मंगेश ताटे, वनपरिक्षेत्र अधिकारी पुर्व पेंच पिपरिया,

श्री राहुल शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबाहुली, श्री अभिजित इलमकर वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार, श्री संजय मोहोड वनपरिक्षेत्र अधिकारी सालेघाट, श्री विशाल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम पेंच , श्री प्रवीण लेले वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी (ए.नि.) आणि अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक नागपूर. क्षेत्र सहायक संजय परेकर, राजीव मेश्राम, आशा डोंगरे, वनपरिक्षेत्र पूर्व पेंच, पवनी, चोरबाहुली आणि देवलापार मधील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: