Friday, May 17, 2024
Homeराज्यशिवजयंतीचे औचित्य साधून पुलावामा हल्ल्यातील शहिदांना दिली श्रद्धांजली...

शिवजयंतीचे औचित्य साधून पुलावामा हल्ल्यातील शहिदांना दिली श्रद्धांजली…

Share

  • भारतीय जनता युवा मोर्चाचा अभिनव उपक्रम.
  • मयूर दंढारे दरवर्षी घेतात श्रद्धांजलीचा कार्यक्रम.
  • 45 रक्तदात्यानी दिले रक्तदान.
  • लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन.

नरखेड – अतुल दंढारे

शिवजयंतीचे औचित्य साधून पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 45 रक्तदात्यानी यावेळी रक्तदान करत छञपती शिवाजी महाराज व पुलवामा हल्यातील शहिदांना अभिवादन केले.

बस स्थानक परिसरात रक्तदान व शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी मयूर दंढारे अशा प्रकारचे अभिनव उपक्रम राबवत असतात.शिवजयंती फक्त रॅली काढूनच साजरी करता येत नाही पण त्यातून आपल्या राजा चा संदेश समाजापर्यंत जावा हा आदर्श डोळयांसमोर असतो, त्यातूनच एका शिवजयंतीला एका मूकबधिर बघिणीचे लग्न लावून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवजयंती साजरी केली होती,

युवकांना देश प्रेम,धर्म प्रेम, सेवेची प्रेरणा मिळावी यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे असे मत मयूर दंढारे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, तालुकाध्यक्ष दिलेश ठाकरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुषमाताई राऊत, भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मयूर दंढारे,

उपसरपंच मयूर सोनोने, रमेश वाडकर, ग्रामपंच्यायत सदस्य अधीर चौधरी, सुरेश बारापात्रे, नरेंद्र बिहार, प्रफुल कोढे, हुरबेग मिर्झा, योगेश मानकर, बबलू नागमोते, इंद्रपाल चौधरी, प्रशांत मेहेत्रे, पंकज मेहेत्रे, प्रताप वानखडे व मोठ्या संख्येने गावकरी व युवकवर्ग यावेळी उपस्थीत होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: