Saturday, June 1, 2024
Homeराज्यरामटेक | मच्छीमार सोसायटी येथे मकर संक्रांतीच्या निमित्त हळदीकुंकू सोहळा संपन्न...

रामटेक | मच्छीमार सोसायटी येथे मकर संक्रांतीच्या निमित्त हळदीकुंकू सोहळा संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामधाम मनसर संस्थापिका सौ संध्याताई चंद्रपालजी चोकसे व सर्व महिला भगिनीं रामटेक च्या वतीने मच्छीमार सोसायटी येथे मकर संक्रांतीच्या निमित्या हळदीकुंकू कार्यक्रमाचा सोहळा पार पडला यानिमित्ताने सौ शोभाताई राऊत माजी नगराध्यक्षा रामटेक,सौ शारदा दुर्जनजी बर्वे महिला काँग्रेस नेता, रामटेक शहर सौ विमलताई नागपुरे सौ प्रियंका मोहन कोठेकर यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सौ रश्मीताई बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवले कार्यक्रमात सौ दीपाताई चव्हाण महिला सेल, सौ कांचनमालाताई माकडे ,सौ सुषमा महाजन परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम मार्गदर्शिका, मंदाताई कुलरकर ज्येष्ठ शिक्षिका ,

सौ अश्विनीताई कराडे , तुळसाबाई महाजन माजी नगरसेविका .सौ प्रणिताताई भैसारे, अर्पणाताई वासनी माजी सरपंच सुलोचनाताई कारमोरे ,सौ विमलताई वंजारी , सौ प्रियंका कोठेकर, सौ मनीषा कोठेकर, सौ ममताताई राणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात उखाण्याची मेजवानीच झाली व उखाण्याचा हजारो महिलांनी आस्वाद घेतला कार्यक्रमात प्रत्येक महिलांना हळदीकुंकू वाण व अल्पोहार देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रश्मी बर्वे यांनी आयोजकांच्या कार्याबद्दल व वर्षभर रामधाम च्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल,

उदाहरणार्थ वृक्षारोपण सामूहिक विवाह सोहळा धार्मिक उत्सव यासारख्या अनेक कार्याची स्तुती करून महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाच्या शेवटी सौ शारदाताई बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीटी रघुवंशी काँग्रेस नेते रामटेक ,दुर्जनजी बर्वे , मोहनजी कोठेकर ,सागर वाघमारे , श्रीमती शारदाताई बर्वे , मंदाताई कुलरकर , प्रियंकाताई कोठेकर, मनीषाताई कोठेकर ,यांनी अथक परिश्रम घेतले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments