Sunday, April 28, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटलांचा नव्हे तर प्रवृत्तीचा निषेध, नवी मुंबई पत्रकारांचे निषेध आंदोलन...

चंद्रकांत पाटलांचा नव्हे तर प्रवृत्तीचा निषेध, नवी मुंबई पत्रकारांचे निषेध आंदोलन…

Share

किरण बाथम, कोकण

गोविंद वाकडे या पत्रकाराची सुटका झाली तरी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका नवी मुंबई पत्रकारांनी घेतली आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पत्रकारांनी निषेध आंदोलन केले. संघटना नाही तर एकजूट आणि आपल अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी एक ठोस निर्णय आवश्यक असल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे पत्रकारांनी म्हटले. पत्रकारांनी आंदोलनाचे शस्त्र काढल्यावर गोविंद यांची सुटका झाली.

मात्र ही जिंकलेली अर्धीच लढाई आहे. चुकीचे असेल तर लिहिण्याचा अधिकार राहू द्या आणि चांगल बरोबर केलं तर कौतुक करण्यासाठी लिहू द्या. पण तुमच्या मनासारखे करायला भाग पाडू नका , सत्तेचा अमरपपट्टा बांधून कोणी येत नाही. आणि सत्य लपवले म्हणून मिटत नाही.

आंदोलकर्त्यांनी पत्रकारांना बोलवले तर त्यात पत्रकार दोषी असेल म्हणून त्या अँगल त्याच्यावर निशाणा साधला, आम्ही मुखमंडल बंद ठेवून नेमक काय घडलं खर काय आहे हे तपासू मग भूमिका घेवू असे सांगून गप्प बसणे याचा अर्थ लावत बसणार नाही.

पण अकरा पोलिसांवर निलंबन एक पत्रकाराला पोलीस ठाण्यात नेणे त्याच्यावर गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करणे हा सारा प्रकार मुस्कटदाबी प्रकारात मोडणारा असल्याचे आंदोलक पत्रकारांनी म्हटले. या आंदोलनानंतर पत्रकारांनी कोकण आयुक्त तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच माहिती आणि जनसंपर्क अधिकारी नवी मुंबई यांना निवेदन दिले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: