Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीपहाटेच्या अपघातात मुंबई-गोवा महामार्गांवर चिमुकल्या मुलासह नऊ जणांचा मृत्यू...

पहाटेच्या अपघातात मुंबई-गोवा महामार्गांवर चिमुकल्या मुलासह नऊ जणांचा मृत्यू…

कोकण – किरण बाथम

माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ट्रक व इको गाडी यांच्यात अपघात झाला. अपघातात मु.पो.हेदवी गुहागर चे रहिवाशी असलेले पाच पुरुष व चार महिला तसेच चार वर्षाचा चिमुकला लहानगा असे दहाजण मयत झाले.

आज पहाटे ०४.४५ वा गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये अपघात झाला आहे.

Mumbai-Goa highways

अगोदर लहान मुलगा जखमी होता.त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले होते.मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते. हायवे वरची वाहतूक सुरळीत झाली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: